गुहागर तालुक्यातील पडवे मोहल्ला येथे हाणामारी प्रकरणी १३ जणांवर गुन्हा


गुहागर तालुक्यातील पडवे मोहल्ला येथे मोहरमची मिरवणूक काढण्यावरून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ जून रोजी ही घटना घडली होती.
शहीबाज इकबाल इब्जी, शादाब महबुब भाटकर, मुबीन मलीक इब्जी, मलीक इसाक इब्जी, मान अन्वर इब्जी, साईक अन्जुम चिपळुणकर, कैफ महम्मद शरीफ सारंग, जहर आदम तांडेल, रफिक लतिफ सारंग, सकावत अन्वर इब्जी, दानिश इरशाद सारंग, आरशिया शहानुर टेमकर, सहीफा जुनेद तवसाळकर (सर्व रा.पडवे, रहीमत मोहल्ला) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. याबाबत पडवे मोहल्ला येथील शाकिरा मुस्तफा सारंग, (३५ वर्षे, रहीमत मोहल्ला) या महिलेने फिर्याद दाखल केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button