रत्नागिरी शहराजवळील कोकणनगर येथे मोकाट बैलाची दुचाकीला धडक; तरुण गंभीर जखमी


रत्नागिरी शहराजवळील कोकणनगर येथील क्रांतीनगर परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोकाट बैलाने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गौरव पवार (२८, शीळ – रत्नागिरी) या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, रस्त्यावर मोकाट फिरणारा बैल अचानक भरधाव वेगाने दुचाकीसमोर आल्याने हा अपघात घडला. बैलाच्या धडकेने दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला. अपघातानंतर परिसरामधील नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमी तरुणाला मदत केली. याचवेळी कीर्तीनगर येथील एका रिक्षाचालकाने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत क्षणाचाही विलंब न लावता जखमीला स्वतःच्या रिक्षातून रुग्णालयात दाखल केले विशेष म्हणजे, त्याने कोणतेही भाडे न घेता मानवतेचा आदर्श समोर ठेवला. त्याच्या या तत्परतेचे उपस्थित नागरिकांनी मनापासून कौतुक केले.
कोकणनगर परिसरात मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून वाहनचालक आणि पादचार्‍याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्य रस्त्यांवर, चौकांमध्ये आणि वर्दळीच्या ठिकाणी मोकाट गुरांचा मुक्त संचार असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button