
निवधे धनगरवाडी येथे सर्पदंशामुळे ५० वर्षीय शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
निवधे धनगरवाडी येथे सर्पदंशामुळे ५० वर्षीय शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृताचे नाव सुरेश फटू कोलापटे असे आहे.
२८ ऑगस्टच्या संध्याकाळी सुमारे पाच वाजता राहत्या घरी त्यांना सर्पदंश झाला. त्यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारांसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.




