समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागाची २१ व २२ नोव्हेंबर रोजी जनसुनावणी; रत्नागिरी जिल्ह्याची सुनावणी २२ नोव्हेंबरला


रत्नागिरी, दि. १२ ): समान नागरी कायद्याबाबत (UCC) विविध हितसंबंधी गट, संस्था व नागरिकांच्या सूचना, हरकती आणि मते जाणून घेण्यासाठी शासनामार्फत गठित करण्यात आलेल्या समितीद्वारे कोकण विभागाची जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. ही सुनावणी दिनांक २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांचे कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई येथे होणार असून, जिल्ह्याची जनसुनावणी रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली आहे.
विभागीय आयुक्त (कोकण विभाग) रूबल अग्रवाल यांच्या मार्फत कोकण विभागातील नागरिकांना या जनसुनावणीत सहभागी होण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
कोकण विभागातील जिल्हानिहाय जनसुनावणीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
२१ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबई शहर सकाळी ११ ते १२ वाजता, मुंबई उपनगर दुपारी १२.३० ते १.३० वाजता, पालघर दुपारी ३ ते सायंकाळी ४ वाजता, सिंधुदुर्ग सायंकाळी ४.३० ते ५.३० वाजता.
२२ नोव्हेंबर २०२६ रोजी ठाणे सकाळी ११ ते दुपारी १२ वाजता, रायगड दुपारी १२.३० ते १.३० वाजता, रत्नागिरी दुपारी ३ ते सायंकाळी ४ वाजता
सुनावणीचे ठिकाण व उपस्थित राहण्याबाबतच्या सूचना :

  • संबंधित गट, संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिकांना विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांचे कार्यालय (समिती सभागृह, पहिला मजला, कोकण भवन, नवी मुंबई) किंवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय येथे निर्धारित दिवशी, निर्धारित वेळेपूर्वी १ तास अगोदर उपस्थित राहता येईल.
  • नवी मुंबई येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची सुनावणी समितीसमोर समक्ष घेण्यात येईल.
  • तर, संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्ही.सी.) घेण्यात येणार आहे.
    ऑनलाईन मत नोंदविण्याची सुविधा :
    ज्या नागरिकांना प्रत्यक्ष किंवा व्ही.सी. द्वारे उपस्थित न राहता केवळ ऑनलाईन पद्धतीने आपले मत सादर करावयाचे आहे, त्यांना महाराष्ट्र शासनाच्या https://ucc.maharashtra.gov.in/ या अधिकृत पोर्टलवर ३७ मुद्द्यांच्या आधारे आपली माहिती व मते नोंदविता येतील, असेही प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button