थ्रीडी रांगोळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचं दर्शन !

रत्नागिरीच्या शैक्षणिक वैभवात मोलाचं योगदान देणाऱ्या पटवर्धन हायस्कूलला १२५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्त आणि दिवाळीचं औचित्य साधून विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक थ्रीडी रांगोळी प्रदर्शनाला आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी भेट दिली.

वन्यजीवांपासून ते जागतिक फुटबॉल विश्वापर्यंत विविध विषय विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून अत्यंत कल्पकतेनं मांडले आहेत. रांगोळीच्या प्रत्येक रंगातून विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, कलात्मकता आणि त्यांच्या विचारांची व्यापकता अनुभवायला मिळाली. या अप्रतिम कलाविष्कारातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचं दर्शन घडलं, असे म्हणत मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सर्वांचे कौतुक केले.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक-कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी अनौपचारिक संवाद साधला. तब्बल सव्वाशे वर्षांची शैक्षणिक परंपरा जपत नव्या पिढीच्या सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या शाळेच्या प्रयत्नांची यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी प्रशंसा केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button