मोकाट आणि आक्रमक कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषद श्वान निवारा केंद्र उभारणार


शहरातील डीएसपी बंगल्याजवळ अनलेल्या पोलीस लाईन परिसरात चार वर्षांच्या प्रणव राम खेडेकर या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटनेनंतर रत्नागिरी नगरपरिषदेकडून शहरातील मोकाट आणि आक्रमक कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी चंपक मैदानावर निवारा केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उपमुख्याधिकारी मयूर बेहरे यांनी ही माहिती दिली आहे. पिसाळलेले, रोगी किंवा आक्रमक झालने कुत्रे सांभाळण्यासाठी नगरपरिषद लवकरच हे निवारा श्वान निवारा  केंद्र सुरु करणार आहे, यासाठी शहरातील चंपक मैदान परिसरात सुमारे दीड हेक्टर जागा निश्चित करण्यात आली आहे. ऍनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या केंद्राची संपूर्ण आखणी केली जात असून त्यासाठी आवश्यक ते अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. हे अंदाजपत्रक या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता असल्याचेही बेहरे यांनी स्पष्ट केले. यापूर्वी हे निवारा केंद्र रत्नागिरी तालुक्यातील कसोप ग्रामपंचायत क्षेत्रात उभारणे प्रस्तावित होते. मात्र आता थेट शहरातच चंपक मैदानाची दीड हेक्टर जागा उपलब्ध झाल्यामुळे हे केंद्र तेथेच उभारण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतल्याचे बेहरे यांनी सांगितले.
रत्नागिरी नगर परिषदेच्या २०२४-२५ मधील सर्वेक्षणात शहरात सुमारे ३,६०० मभटक्या कुत्र्याची नोंद झाली होती. ज्यापैकी १,६०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले होते मात्र, ग्रामीण भागातून शहरात येणार्‍या कुत्र्यांमुळे ही संख्या नियंत्रित करणे आव्हानात्मक ठरले होते. आता चपक मैदानावरील प्रस्तावित निवारा केंद्रामुळे शहरातील मटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्कायो तोडगा निघेल, असा विश्वास बेहरे यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button