रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी-कुंभारवाडी येथे घराची सफाई करताना पडल्याने वृद्धाचा मृत्यू


रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी-कुंभारवाडी येथे घराची साफसफाई करताना पडून गंभीर जखमी झालेल्या वृध्दाचा मृत्यू झाला. सुभाष गणपत साळवी (७०, रा. हरचेरी-कुंभारवाडी, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. याबाबत मुलगी प्रीती मंदार आष्टेकर (मुळ रा. डोंबिवली) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. ५ सप्टेंबर रोजी सुभाष सावळी हे राहत्या घराच्या माळ्याची साफसफाई करत होते. यावेळी काम करताना माळ्यावरुन खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते बेशुध्द पडले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याठिकाणी उपचार सुरु असताना ७ सप्टेंबर रोजी सुभाष सावळी यांचा मृत्यू झाला, अशी नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button