
रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथे गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथील सोसायटीच्या टेरेसवर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारस उघडकीस आली. शन्मुख अप्पासाहेब निंबाळ (३१, रा. वृदावन सोसायटी कुवारबाव) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची पत्नी साधना निंबाळ हिने शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. शन्मुख निंबाळ याची पत्नी त्याला पाहण्यासाठी सोसायटीच्या टेरेसवर गेली होती. यावेळी तिला शन्मुख याने तेथील लोखंडी अँगलला कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या काळ्या रंगाच्या केबलने गळफास घेतल्याचे दिसून आले. तिने आरडा-ओरडा करताच रहिवाशांनी टेरेसवर धाव घेतली. त्यांनी शन्मूखला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.




