जगबुडी पुलावरील संरक्षक भिंतीचे काम पूर्णत्वास, अपघात रोखण्यास मदत होणार


मुंबई गोवा महामार्गावरील भरणे येथील नव्या जगबुडी पुलालगतच्या मोकळ्या जागी संरक्षक भिंत उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. या संरक्षक भिंतीमुळे अपघात रोखण्यास मदत होणार असल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग विभागाने केला आहे.
भरणेतील नव्या जगबुडी पुलावर अपघातांचे सत्र सुरुच असल्याने वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. त्यातच गत महिन्यात नव्या जगबुडी पुलालगतच्या मोकळ्या जागेतून कंटेनर थेट नदीपात्रात कोसळून चालकाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने गर्डर बसवत मलमपट्टी केली होती. यानंतर टीकेची झोड उठताच तातडीने संरक्षक भिंत उभारणीचे काम हाती घेण्यात आले.
सद्यस्थितीत संरक्षक भिंत उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर याठिकाणी उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीमुळे कोकणवासियांचा परतीचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button