गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग सज्ज


आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणार्‍या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग सज्ज झाला आहे. महामार्गावर ज्याठिकाणी कामे सुरू आहेत, तेथे गणेशभक्तांच्या योग्य मार्गदर्शनासाठी डायव्हर्जन आणि मार्गदर्शक फलक तातडीने लावण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी विभाग कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी दिल्या आहेत.
यासाठी अभियंत्यांकडून जागा निश्चित करण्यात आल्या असून येत्या दोन दिवसांत हे फलक लावले जाणार आहेत. पाहणीदरम्यान पुलाच्या कामाची सद्यस्थिती, वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला मार्ग आणि वाढत्या वाहनामुळे होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टळावी, यासाठी परस्पर समन्वयाने काम करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. गणेशोत्सवात कोकणात येणार्‍या भाविकांची कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न विभागाकडून स्पष्ट करण्यात आले करत असल्याचे राष्ट्रीय महामार्ग आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button