
उद्धव ठाकरे शिवसेने कडून रत्नागिरीत शिवसेना नेते बाळ माने यांच्या उपस्थितीत जन आक्रोश मोर्चा
उद्धव ठाकरे शिवसेने कडून जिल्ह्यात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात हा मोर्चा असल्याचे सांगून मुंबईमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला नंतर रत्नागिरीत शिवसेना नेते बाळ माने यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बोलताना बाळमाने यांनी सांगितले की शिवसेना पक्षप्रमुख, मा. मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार *महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे. यासाठी शिवसेना रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने जनआक्रोश आंदोलन
जिल्हाधिकारी कार्यालय समोर करण्यात आले
या बाबत बोलताना शिवसेना नेते बाळ माने यांनी सांगितले की
महाराष्ट्रा मध्ये आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात आले होत.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे जन आक्रोश आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी या जनतेच्या माध्यमातून करत आहे
यावेळी जिल्ह्याचे आमचे संपर्क प्रमुख सहदेव बेटकर जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम जिल्ह्याचे उत्तर आपल्या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख व रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहराचे शहर प्रमुख प्रशांत साळुंखे व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते




