केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश


केदारनाथमध्ये पुन्हा हेलिकॉप्टर अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये आज सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळले. गौरीकुंड परिसरातील त्रिजुगीनारायण नारायणजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे होते आणि ते केदारनाथ धामहून फाटा येथे जात होते. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व ७ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत. उत्तराखंडचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था डॉ. व्ही. मुरुगेशन हे देखील पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचले आहेत.
रविवारी सकाळी उत्तराखंडमधील केदारनाथजवळ आणखी एक हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह ७ जण होते असे सांगितले जात आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशनचे होते आणि ते गौरीकुंडजवळ बेपत्ता झालं होतं, अशी माहिती उत्तराखंडचे अतिरिक्त महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी दिली.
देहरादूनहून केदारनाथला जात असताना आज सकाळी त्रिजुगीनारायण आणि गौरीकुंड दरम्यान हे हेलिकॉप्टर बेपत्ता झाले होते. काही महिलांनी अपघाताबद्दल सांगितले. अपघाताच्या वेळी गौरीकुंडवर गवत कापत असताना त्यांनी अपघात पाहिला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला. हेलिकॉप्टर गौरी माई खार्कच्या वरच्या जंगलात पडले आहे. मृतदेह हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून पोलिसांनी ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. हेलिकॉप्टर अपघातात बीकेटीसी कर्मचारी विक्रम सिंह रावत यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाने हेलिकॉप्टर अपघाताबाबत एक निवेदन जारी केले आहे. “श्री केदारनाथ धामहून गुप्तकाशीला जाणारे हेलिकॉप्टर आज सकाळी ५:२० वाजता गौरीकुंडजवळ कोसळल्याची माहिती मिळाली आहे. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सहा प्रवासी (५ प्रौढ आणि १ मूल) होते. हेलिकॉप्टरमधील प्रवासी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील आहेत. मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएप आणि एसडीआरएफ पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत, असं निवेदनात म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button