चिपळूणमध्ये २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू; कळवंडे माडवाडीतील घटना

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील कळवंडे माडवाडी येथे २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. प्रशांत प्रदीप उदे (वय २३, रा. कळवंडे माडवाडी, ता. चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजण्यापूर्वी ही घटना घडली. प्रशांत उदे हे राहत्या घराच्या टेरेसवर बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button