चाफवली येथे ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; परिसरात खळबळ

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील चाफवली उगवतीवाडी येथे ४५ वर्षीय विलास दत्ताराम गावडे यांचा मृत्यू झाल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विलास गावडे (वय ४५, रा. चाफवली उगवतीवाडी, ता. संगमेश्वर) हे १८ नोव्हेंबर रोजी सकाळी गुरांना चारा घालण्यासाठी घरातून बाहेर गेले होते. त्यानंतर ते शेजारील वाडीलगतच्या काजूच्या झाडाजवळ आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने खाली उतरवून प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button