
दादर रेल्वे स्थानकाचं नाव चैत्यभूमी होणार नाही, नवा ट्विस्टने गोंधळ संपला; समोर आली मोठी अपडेट
मुंबईतील गजबजलेले आणि मध्यवर्ती दादर स्टेशनच्या नामकरणाचा वाद पेटला आहे. राज्य सरकारने नुकतेच या स्टेशनचे नाव चैत्यभूमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून राजकीय वादाची ठिणगी पडली आहे.दरम्यान या संदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. ‘तो’ प्रस्ताव दादर रेल्वेस्थानकाचा नसून दादर मेट्रो स्थानकासंदर्भात असल्याची माहिती समोर आली आहे. चैत्यभूमी नामकरणासंदर्भातला प्रस्ताव दादर रेल्वे स्थानकाचा नसून दादर मेट्रो स्थानकासंदर्भात आहे.
मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलून चैत्यभूमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे सोशल मीडियावरही या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसल्या. काही जणांनी दादरची ऐतिहासिक ओळख बदलण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केलीये. तर दुसरीकडे तो’ प्रस्ताव दादर रेल्वेस्थानक नसून दादर मेट्रो स्थानकासंदर्भाताला असून डीजीआरपीआरच्या परिपत्रकामुळे गोंधळ वाढला होता.



