अभिजीत दिपकेंकडून PM मोदींच्या पदवीवर प्रश्नचिन्ह! गुणपत्रिकेचा फोटो पोस्ट करत मांडले ४ मुद्दे; म्हणाले, ‘चला, दोघेही विषय संपवूया’!

काॅक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांच्या अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातील शिक्षणावरून सोशल मीडियावर नवा वाद पेटला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर दिपके यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले आव्हान दिले आहे.

‘माझी अमेरिकेतील पदवी (डिग्री) दाखवायला मी तयार आहे, पण अट एकच, पंतप्रधान मोदींनीही त्यांची डिग्री देशासमोर ठेवावी. चला, दोघेही एकत्र डिग्री दाखवूया आणि या वादावर पडदा टाकूया,’ असा टोला दिपके यांनी लगावला आहे.

‘१२ वर्षे देश वाट पाहतोय’

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत अभिजीत दिपके यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी लिहिले, *’लोकांना माझी डिग्री पाहण्याची प्रचंड उत्सुकता लागली आहे आणि त्यांचा संयम आता सुटत चालला आहे. पण मला आश्चर्य वाटते की, गेल्या १२ वर्षांपासून देशातील जनता पंतप्रधानांची डिग्री न पाहता कशी काय शांत राहिली आहे?’

बोस्टन विद्यापीठातील आपल्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देताना दिपके म्हणाले की, पारदर्शकता राखण्यासाठी ते आपली पदवी दाखवण्यास तयार आहेत, परंतु त्याच वेळी देशाच्या प्रमुखांनीही आपली शैक्षणिक पात्रता जाहीर करावी.

पंतप्रधान मोदींच्या डिग्रीवर प्रश्नचिन्ह का? दिपके यांनी मांडले ‘हे’ ४ मुद्दे

आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ अभिजीत दिपके यांनी १९७६ मधील दिल्ली विद्यापीठाच्या गुणपत्रिकांमधील काही त्रुटींकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी उपस्थित केलेले मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे:

संगणकीय गुण विरुद्ध हस्तलिखित गुण: १९७६ मधील इतर विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर मिळालेले गुण हाताने लिहिलेले आहेत; तर पंतप्रधान मोदींच्या गुणपत्रिकेवर ते कॉम्प्युटर किंवा इलेक्ट्रॉनिक टाईपरायटरद्वारे टाईप केलेले दिसतात.
फॉन्टचा वापर: मोदी यांच्या गुणपत्रिकेवर ‘युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली’ हे नाव गॉथिक फॉन्ट (Gothic Font) मध्ये छापले आहे. मात्र, दिल्ली विद्यापीठाने १९८३ नंतरच या फॉन्टचा वापर सुरू केला होता, असा दावा दिपके यांनी केला आहे.
कोड नंबरचा अभाव: १९७६ मधील इतर सहकाऱ्यांच्या गुणपत्रिकेच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात विशिष्ट कोड (उदा. D.U.P. No. 1457) नमूद आहे, जो मोदींच्या मार्कशीटवरून गायब आहे.
‘प्रिपर्ड बाय’ बॉक्स गायब: १९७८ च्या बी.ए. भाग-३ च्या मार्कशीटमध्ये गुणपत्रिका तयार करणाऱ्या (‘Prepared by’) आणि तपासणाऱ्या (‘Checked by’) अधिकाऱ्यांचे दोन बॉक्स असतात. मोदींच्या मार्कशीटमध्ये ‘Prepared by’ चा बॉक्सच उपलब्ध नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button