अवघ्या 14 वर्षांच्या कोवळ्या पोरानं सर्वांनाच घाम फोडला, त्यानं फक्त 35 चेंडूमध्ये तुफानी शतक ठोकलं


आयपीएल 2025 स्पर्धेला चांगलाच रंग चढला आहे. 28 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन दिग्गज संघांच्या सामन्याची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे.या सामन्यात अवघ्या 14 वर्षांच्या कोवळ्या पोरानं सर्वांनाच घाम फोडला आहे. त्यानं फक्त 35 चेंडूमध्ये तुफानी शतक ठोकलंय. दरम्यान, त्याच्या या दैदीप्यमान कामगिरीचे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात कौतुक होत आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या सामन्यात गुजरातने राजस्थानपुढे विजासाठी 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान गाठण्यासाठी राजस्थानला फार काही मोठे कष्ट करावे लागले नाही. सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी या जोडगोलीने तुफानी फलंदाजी केली. यशस्वीने अवघ्या 40 चेंडूमध्ये तब्बल 70 धावा केल्या तर वैभव सूर्यवंशीने फक्त 38 धावांत तब्बल 101 धावा काढल्या. त्याने 35 चेंडूंमध्ये तुफानी शतक ठोकलं. आपल्या या खेळीत त्याने तब्बल 11 षटकार तर 7 चौकार मारले. त्याच्या याच तुफानी खेळीचं जगभरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button