खेड पोलिसांची दमदार कामगिरी; घरफोडी प्रकरणातील आरोपी मुंबई व उत्तर प्रदेशातून जेरबंद

१० लाखांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत; खेड पोलिसांच्या तपास पथकाला यश

खेड : खेड पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा कोणताही ठोस सुगावा नसताना खेड पोलिसांच्या तपास पथकाने तांत्रिक तपास व कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेत त्यांना धारावी, मुंबई आणि प्रयागराज, उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतले. या कारवाईत चोरीचा सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
खेड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३२/२०२६ मधील घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपींची ओळख पटविणे आणि त्यांचा माग काढणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र तपास पथकाने विविध माहितीच्या आधारे तपासाची चक्रे गतिमान केली. अखेर आरोपींचा शोध घेऊन त्यांना मुंबईतील धारावी तसेच उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून ताब्यात घेण्यात यश मिळविले.
या कारवाईदरम्यान चोरीस गेलेला सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून, चोरीच्या गुन्ह्यातील अन्य बाबींचा शोध पोलीस घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. जी. महामुनी, खेड उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शैलेश सनस आणि खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या तपास पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, पोलीस शिपाई विजेंद्र सातार्डेकर, अजय कडू, कृष्णा दराडे आणि सोहेल ढगे यांचा समावेश होता. गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले हे आहेत.
सदर गुन्हा भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(३), ३(५) व ३१७(२) अन्वये दाखल करण्यात आला आहे.
खेड पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि तपासातील कौशल्य अधोरेखित झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button