
वांद्री कुणबीवाडी येथे गुरुवारी संत निरंकारी आध्यात्मिक सत्संग सोहळा
संगमेश्वर : तालुक्यातील वांद्री कुणबीवाडी येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने भव्य आध्यात्मिक सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा उद्या (२६ नोव्हेंबर) सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेत वांद्री कुणबीवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिर सभागृहात पार पडणार आहे.
या आध्यात्मिक सत्संग सोहळ्यास मुंबई येथील ज्येष्ठ ज्ञानप्रचारक प. आ. राजेंद्र थोरात यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, ते उपस्थित भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणार आहेत. निर्गुण, निराकार प्रभू परमात्म्याची ओळख करून घेणे हे मानवी जीवनाचे परम कर्तव्य आहे, हा संदेश या सत्संगातून दिला जाणार आहे.
सत्संगाच्या समाप्तीनंतर इच्छुक जिज्ञासू भाविकांना ‘ब्रह्मज्ञान’ प्राप्ती करून दिली जाणार आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या आध्यात्मिक सत्संगाचा व ब्रह्मज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प. आ. नारायण पवार यांनी केले आहे.




