
सणासुदीच्या तोंडावर महागाईचा झटका! कमर्शियल LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ,
सणासुदीच्या काळाच्या अगदी तोंडावर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका बसला आहे. १ ऑक्टोबरपासून लागू झालेल्या बदलांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.आजपासून मुंबईत व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ६३ रुपयांची वाढ झाली आहे.ती २,७०१ रुपयांवरून २,७६४ रुपयांवर पोहोचली आहे, तर घरगुती सिलिंडरची किंमत ९४१.५० रुपयांवर स्थिर आहे.
दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरसाठी ६२.५० रुपये अधिक मोजावे लागतील. गेल्या महिन्यात (सप्टेंबरमध्ये) दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत ९.५० रुपयांनी वाढून २,७४७.५० रुपये झाली होती; आज त्यात आणखी ६२.५० रुपयांची वाढ होऊन ती २,८१० रुपयांवर पोहोचली आहे. दरम्यान, पाटण्यात या सिलिंडरच्या किमतीत ७१.५० रुपयांची वाढ झाली आहे.
देशभरात लेहपासून कन्याकुमारीपर्यंत आणि अहमदाबादपासून ईशान्येकडील राज्यांपर्यंत-१९ किलोच्या एलपीजी सिलिंडरचे दर वाढले आहेत. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही




