
परराज्यातील लॉटरीच्या आक्रमणामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरीची विक्री घटली.
परराज्यातील लॉटरीच्या आक्रमणामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरीची विक्री घटली आहे. पण आता केरळ राज्य लॉटरीचा अभ्यास करण्यासाठी महायुती सरकारने भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली दहा जणांची समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे.परराज्यातील लॉटरीच्या आक्रमक विक्रीमुळे गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या विक्रीत घट झाली आहे. पंजाब, राजस्थान, नागालँड, मिझोराम, गोवा अशा विविध राज्यांच्या लॉटरीनी महाराष्ट्रात हायपाय परसले. वित्त खात्याच्या अखत्यारीतील राज्य लॉटरी संचालनालयाच्या धोरणामुळे राज्याच्या लॉटरी विक्रीत कमालीची घट झाली.
महाराष्ट्र राज्याच्या लॉटरी विक्रीतून 25 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. तर इतर राज्याच्या लॉटरी विक्रीतून 150 कोटी रुपयांचा महसूल जीएसटीच्या माध्यमातून मिळतो.मध्यंतरी तोटा झाल्याने महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा घाट सरकारने घातला होता; पण महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेना या संघटनेने वित्तमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर लॉटरी बंद करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने दिली.