निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चिपळूणच्या तपासणीत अडीच लाखांची रक्कम जप्त.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास चिपळूण तालुक्यातील पेढे फरशी तिठा येथे तपासणी पथकाला अडीच लाखांची रक्कम सापडल्याची खळबळजनक घटना घडली. या रक्कमेची कागदपत्र नसल्याने ही रक्कम जप्त करत चिपळूण ट्रेझरीकडे जमा करण्यात आली आहे.निवडणूक आचारसंहिता लागू होताच त्यानुसार कार्यरत असलेल्या तपासणी पथकाद्वारे शहरास जोडणार्‍या मुख्य रस्त्यावरच्या वाहनांची तपासणी सुरू आहे. असे असताना मंगळवारी पेढे फरशी तिठा येथे तपासणी पथकाकडून तपासणी सुरू असताना एका वाहनात अडीच लाखाची रक्कम सापडली. या रक्कमेची कागदपत्र नसल्याने ती रक्कम चिपळूण ट्रेझरी येथे जमा करण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी रत्नागिरीतील आचारसंहिता पथकाकडे याचा अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी दिली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button