
उद्धव ठाकरे यांचा मंगळवारपासून झंझावाती दौरा, कोकणातून सुरुवात; पहिल्या टप्प्यात 8 मतदारसंघ!
दिवाळीनंतर पुढच्या आठवड्यापासून खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मंगळवार, 5 नोव्हेंबरपासून झंझावाती प्रचार दौरा सुरू होणार आहे. कोकणातून या दौऱयाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 8 विधानसभा मतदारसंघांचा दौरा उद्धव ठाकरे करणार आहेत.*उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर आहे. त्याच दिवशी लढतींचे चित्र स्पष्ट होणार असून त्यानंतर प्रचाराला अवघे 15 दिवस मिळणार असल्याने लगेचच प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे. त्यादृष्टीने शिवसेनेने जोरदार आखणी केली असून 5 ते 8 नोव्हेंबरदरम्यान उद्धव ठाकरे झंझावाती दौऱयावर जाणार आहेत. याबाबत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून माहिती देण्यात आली.* 5 नोव्हेंबर सायं. 6 वाजता रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा* 6 नोव्हेंबर दुपारी 3 वाजता भिवंडी ग्रामीण विधानसभा* सायं. 7 वाजता वांद्रे-कुर्ला संकुल मैदान येथील महाविकास आघाडीची सभा* 7 नोव्हेंबर दुपारी 3 वाजता दर्यापूर विधानसभा* सायं. 5 वाजता बडनेरा विधानसभा* 8 नोव्हेंबर दुपारी 3 वाजता बुलढाणा विधानसभा* सायं. 5 वाजता मेहकर विधानसभा* सायं. 7 वाजता परतूर विधानसभा*महाविकास आघाडीची बुधवारी बीकेसी मैदानावर विराट सभा*महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ येत्या बुधवारी 6 नोव्हेंबर रोजी फुटणार आहे. बीकेसी मैदानावर 6 नोव्हेंबरला महाविकास आघाडीची विराट सभा होणार आहे. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.