
भारत संचार निगम लिमिटेड वर्धापन दिनानिमित्त रेखाचित्र स्पर्धेचे बक्षीस वितरण
रत्नागिरी, दि. ७ (जिमाका) : भारत संचार निगम लिमिटेड चा 25 वा स्थापना दिन दि. १ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने रेखाचित्र स्पर्धेचे बक्षीस वितरण येथील बी एस एन एल उपमहाप्रबंधक अरुण चवळी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक महाव्यवस्थापक सचिन कांबळे व अमृता लेले, बीएसएनएलचे सर्व अधिकारी व कर्मचारी, सहभागी शाळांचे शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. 27 व 28 सप्टेंबर रोजी स्मार्ट लर्निंग युजिंग बीएसएनएल भारत फायबर या विषयावर ही स्पर्धा झाली होती. यामध्ये कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिर, रत्नागिरी, लोकमान्य टिळक विद्यालय नगरपरिषद शाळा नंबर दोन, रत्नागिरी शाळांनी सहभाग घेतला होता. प्रथम बक्षीस कुमार अस्मित कुंभवडेकर, द्वितीय कुमारी अंशिका निकंबे आणि तृतीय कुमारी स्वरा आठल्ये (कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिर, रत्नागिरी) यांना देण्यात आले. बीएसएनएलकडून विजेत्यांना मेडल, प्रमाणपत्र, बक्षीस आणि अनुक्रमे एक वर्ष, सहा महिने आणि तीन महिने मोफत एफ टी टी एच कनेक्शन देणार असल्याचे संयोजकांनी जाहीर केले.