
चिपळुणात दुचाकीच्या किरकोळ अपघातानंतर भररस्त्यात एकाची दुसर्यास फिल्मी स्टाईलने मारहाण
_चिपळूण शहरातील काविळतळी येथे मंगळवारी दुचाकीच्या किरकोळ अपघातानंतर भररस्त्यात एकाने दुसर्यास फिल्मी स्टाईलने मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर मारहाण करणार्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकार्याला चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.गणेश अनंत भोंदे (३५, चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद अस्ताफ हुसेन गोठे (३४, गोवळकोट) यांनी दिली आहे. अस्ताफ गोठे हे दुचाकीवरून खाद्य पदार्थांच्या वस्तू आणण्यासाठी शहर बाजारपेठेकडून बहाद्दूरशेख नाक्याकडे जात होते. असे असताना त्यावेळी काविळतळी येथे दोन दुचाकींचा किरकोळ स्वरूपात अपघात झाला. काही किरकोळ वादानंतर यावर पडदा पडला, असे असताना घटनास्थळी असलेला प्रहार जनशक्ती पक्षाचा पदाधिकारी गणेश भोंदे याने अतिउत्साहात दुचाकीवर असलेल्या अस्ताफ गोठे यांना मारहाणीसह शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. www.konkantoday.com