
मंडणगड व खेडशी येथून दोन व्यक्ती बेपत्ता; माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन
रत्नागिरी, दि. 1 ) : मंडणगड तालुक्यातील तिडे आदिवासीवाडी येथून एक महिला आणि रत्नागिरी तालुक्यातील खेडशी येथून एक युवक बेपत्ता झाले असून, त्यांच्याबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मंडणगड तालुक्यातील तिडे आदिवासीवाडी येथील ताई शांताराम जाधव (वय ५६) या दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाल्या आहेत. त्यांचे वर्णन खालीलप्रमाणे आहे:
- उंची : ४ फूट ३ इंच
- वर्ण : निमगोरा, चेहरा गोल, नाक सरळ आणि डोळे काळे
- पोशाख : लाल रंगाची साडी व त्यावर पिवळ्या रंगाचा बारीक फुलांची नक्षी असलेला ब्लाऊज
- इतर खूण : गळ्यात काळ्या मण्यांचे मंगळसूत्र
या महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ मंडणगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
खेडशी येथून युवक बेपत्ता
दुसऱ्या घटनेत, खेडशी (मोरया एकतानगर, ता. जि. रत्नागिरी) येथील सुयोग उत्तम कोलगे (वय २६) हे दि. २० ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून निघून गेले असून अद्याप घरी परतलेले नाहीत. त्यांचे वर्णन खालीलप्रमाणे आहे: - उंची : ५ फूट ३ इंच
- वर्ण : गोरा, चेहरा उभा, बारीक बांधा, दाढी व मिशी असलेले
- पोशाख : निळ्या रंगाचा फुलांचा टी-शर्ट व निळ्या रंगाची फुल जीन्स
- वस्तू व वाहन : मोटो कंपनीचा टॅब, आयफोन मोबाईल आणि मरून रंगाची ॲक्टिव्हा दुचाकी (क्र. MH 08 AH 4237)
श्री. कोलगे यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास अथवा ते आढळून आल्यास नागरिकांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




