
चिपळूण नगरपालिकेची यंत्रणा सज्ज चिपळूण-गोवळकोट खाडीत बोट चालवण्याचा सराव
पावसाळ्यासाठी नगर परिषदेची यंत्रणा सज्ज झाली आहे. तरीही शहरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना सर्व प्रकारची मदत सहज देता यावी यासाठी प्रशासन अधिक सतर्क होत आहे. यातूनच कर्मचार्यांना सातत्यााने बोटी चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. मंगळवारी नियुक्त बोटी चालकांकडून गोवळकोट खाडीत पुन्हा प्रशिक्षण देण्यात आले.यावर्षी नगर परिषदेने मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. त्यानुसार बाजारपेठ, पेठमाप, गोवळकोट, मुरादपूर, शंकरवाडी, मार्कंडी, चिंचनाका, वडनाका, बसस्थानक, पागमळा हे १० भाग पूरबाधित म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या भागांवर नियुक्त ७ पथके लक्ष ठेवून आहेत.www.konkantoday.com