अल्पवयीन मुलीला फूस लावून नेल्याच्या आरोपातून तरूणाची निर्दोष मुक्तता

रत्नागिरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून नेल्याचा आरोप असलेल्या तरूणाची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सुरज दिलीप बडे असे या तरूणाचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवण्यात आले होते.रत्नागिरी सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी या खटल्याचा निकाल दिला. आरोपीच्यावतीने जिल्हा विधीसेवा प्राधिकरण अंतर्गत लोक अभिरक्षक कार्यालय रत्नागिरीचे मुख्य लोक अभीरक्षक ऍड. उन्मेष उदय मुळये यांनी काम पाहिले. गुन्ह्यातील घटनेनुसार ०६ ऑक्टोबर २०१६ रोजी रत्नागिरी तालुक्यातील गावातून शाळकरी मुलगी बेपत्ता झाली होती. यासंबंधीची तक्रार तिच्या नातेवाईकांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button