संगमेश्वर रोड स्थानकातील तिकीट काउंटर परवान्याबाबत अनियमिततेचा आरोप; भाजप युवा मोर्चाचे संगमेश्वर तालुका (उत्तर) अध्यक्ष स्वप्नील संजय सुर्वे यांनी केली चौकशीची मागणी


कोकण रेल्वेच्या संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावरील STBA तिकीट काउंटर परवाना प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाचे संगमेश्वर तालुका (उत्तर) अध्यक्ष स्वप्नील संजय सुर्वे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी कोकण रेल्वेच्या क्षेत्रीय रेल प्रबंधकांकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सुर्वे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, तिकीट काउंटर चालक मंदार मोहन रहाटे यांनी परवाना मिळवताना आवश्यक कागदपत्रांमध्ये जुना पोलीस पडताळणी अहवाल सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी रेल्वे तिकिटांचा कथित काळाबाजार करताना रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई केली होती. त्या प्रकरणाची नोंद अद्ययावत पोलीस पडताळणी अहवालात असणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि रेल्वे नियमांचे पालन करण्याच्या अनुषंगाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, तसेच संबंधित परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी स्वप्नील सुर्वे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button