
रत्नागिरीशहरातील नाचणे रोड पॉवरहाऊस येथील गजानन महाराज मंदिरात आजपासून प्रकटदिन उत्सव
रत्नागिरीशहरातील नाचणे रोड पॉवरहाऊस येथील गजानन महाराज मंदिरामध्ये आज (दि. १ मार्च) ते रविवार दि.३ मार्च या तीन दिवसाच्या कालावधीत गजानन महाराज प्रकटदिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.आज शुक्रवारी १ मार्च रोजी सकाळी रामयाग संपन्न झाला. आज सायंकाळी ४ ते ६ या वेळेत ह.भ.प प्रज्ञा पळसोदकर ( पुणे) यांचे सीताहरण आणि शबरी भेट याविषयावर कीर्तन, सायंकाळी ६.३० नंतर पालखी प्रदक्षिणा / अल्पोपहार, उद्या शनिवार दि.२ मार्च रोजी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत भक्तांचे ‘श्रीं’ वर अभिषेक, सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत पाककला स्पर्धा पदार्थः मोदक स्पर्धेच्या अटी किमान ५ मोदक घरातून करून आणणे, मोदकाची पारी, कळया व थर विचारात घेतला जाईल, सुबक व आकर्षक मांडणी, दुपारी १२ ते १ परीक्षकांची पहाणी व निर्णय, सायंकाळी ४ ते ६ ३०. या वेळेत ह.भ.प हरिहर नातू (पुणे) यांचे समर्थ भक्त एकनाथ कुलकर्णी या विषयावर कीर्तन, सायंकाळी ७.०० नंतर पालखी प्रदक्षिणा / अल्पोपहार, रविवारी ३ मार्च रोजी सकाळी ६.०० ते ५.०० श्री ची पंचामृती पूजा, सकाळी ६. ३० पासून श्री दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण सकाळी ९ ते दुपारी १ – भक्तांचे श्री वर अभिषेक, दुपारी १ ते ३- महाप्रसाद, सायं ४ ते रात्रौ ९ – तीर्थप्रसाद झुणका भाकर, सायंकाळी ४.३० ते ५.३० – रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री डॉ. वंदना रविंद्र धागुर्डे (पुणे) याचे नाट्यगीत गायन, सायं ६ ते ७ बक्षिस वितरण / कृतज्ञता समारंभ, सायं ७ नंतर पालखी प्रदक्षिणा / अल्पोपहारतरी सर्व गजानन भक्तांनी वरील कार्यक्रमात सहभागी होऊन श्रींच्या दर्शनाचा, कीर्तन/गायन श्रवणाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष म. वा देसाई व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.www.konkantoday.com