मंडणगड तालुक्यातील सुर्ले – बौद्धवाडी येथे घरफोडी, १ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास


मंडणगड तालुक्यातील सुर्ले-बौद्धवाडी येथे घरफोडी करून सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही चोरी दि. २८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता ते दि. २९ ’मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३०’ वाजेच्या दरम्यान सुर्ले -बौद्धवाडी येथील फिर्यादी श्रीमती संगीता बाळकृष्ण तांबे (वय ६५) यांच्या राहत्या घरात घडली. याबाबत दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १.३५ वाजता मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
फिर्यादी यांच्या घरातील कपाटाची चावी जुन्या टीव्हीच्या मागे ठेवलेली असल्याचे चोरट्यांनी पाहिले होते. ही चावी घेऊन कपाट उघडण्यात आले. त्यानंतर कपाटातील किमतीचे सोन्याचे दागिने काढून चोरून नेल्याच तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button