**कुवारबाव-रवींद्रनगर नळपाणी योजना पाणीपट्टी कमी करावी-सतेज नलावडे **


   ग्रामपंचायत कुवारबाव अंतर्गत कारवांचीवाडी भागासाठी काही वर्षांपूर्वी नळपाणी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, या योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना अत्यंत जास्त दराने पाणीपट्टी भरावी लागत आहे.
   गेल्या वीस वर्षांपासून सुरू असलेल्या जुन्या कुवारबाव पाणी योजनेअंतर्गत दोन महिन्यांसाठी ११ युनिट पाण्याकरिता सुमारे रु. १८० इतकी पाणीपट्टी आकारली जाते. परंतु कारवांचीवाडी नळपाणी योजनेअंतर्गत दोन महिन्यांसाठी १२ युनिट पाण्याकरिता रु. ३६० इतकी पाणीपट्टी आकारली जात आहे. म्हणजेच करवांचेवाडी योजनेतील पाणीपट्टीचा दर जुन्या योजनेच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे.

विशेष बाब म्हणजे, कुवारबाव गावासाठीचे जुन्या योजनेसाठी पाणी एमआयडीसीकडून ₹१२ प्रति युनिट विकत घेण्यात येत असून त्याचा दर सुमारे रु. १६ प्रति युनिट नागरिकाना आहे. तर करवांचेवाडी योजनेसाठी धरणातील पाणी मोफत उपलब्ध असूनही त्याचा दर सुमारे रु. ३६ प्रति युनिट आकारला जात आहे. शासनाच्या योजनेअंतर्गत पुरवठा होणाऱ्या पाण्यासाठी इतकी जास्त पाणीपट्टी आकारली जाणे नागरिकांच्या दृष्टीने अन्यायकारक वाटते.तसेच योजना कार्यान्वित करणे आधी ग्राहकांकडून ₹५०००/१०,००० बेकायदेशीररीत्या घेण्यात आले होते तेही त्याना परत करण्यात यावेत.
या वाढीव पाणीपट्टीमुळे करवांचेवाडी परिसरातील अनेक कुटुंबांच्या मासिक खर्चावर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून त्यांचे घरगुती बजेट विस्कळीत होत आहे. त्यामुळे करवांचीवाडी नळपाणी योजनेच्या पाणीपट्टीचा फेरविचार करून त्यामध्ये तातडीने व योग्य ती कपात करण्यात यावी व या भागातील नागरिकांना न्याय द्यावा ही मागणी ग्रामपंचायतीकडे करण्यात आली.
यावेळी नितीश आपकरे, प्रियल जोशी, चंद्रकांत पेठे, विवेक राणे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button