डॉ. जयंत नारळीकर यांच्या जन्मदिनानिमित्त रत्नागिरीत १९ जुलैला खगोलशास्त्र कृती कार्यशाळा


रत्नागिरी, दि. १६ : थोर खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या जन्मदिनानिमित्त रत्नागिरीतील शालेय विद्यार्थ्यांसाठी १९ जुलै रोजी विशेष ‘खगोलशास्त्र कृती कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे. खगोलप्रेमी रत्नागिरी आणि आनंदालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच रत्नागिरी नगर परिषदेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
ही कार्यशाळा रविवार, १९ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत श्रीमान हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाच्या व्याख्यानकक्षात होणार आहे. इयत्ता चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा खुली आहे.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने ‘सूर्यमालेचे स्केल मॉडेल’ तयार करण्याची संधी मिळणार असून, ग्रहांचे खरे आकार, त्यांचे परस्परांतील अंतर आणि सूर्यमालेची रचना प्रत्यक्ष कृतीतून समजावून सांगितली जाणार आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतः तयार केलेली ‘खिशातील सूर्यमाला’ (Pocket Solar System) स्मृतिचिन्ह म्हणून घरी घेऊन जाता येणार आहे.
अफाट विश्वाची ओळख करून देणाऱ्या या तीन तासांच्या प्रात्यक्षिक कार्यशाळेसाठी प्रवेश शुल्क केवळ ५० रुपये ठेवण्यात आले आहे. प्रवेशासाठी जागा मर्यादित असल्याने इच्छुक पालकांनी आपल्या पाल्याची नोंदणी लवकरात लवकर करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी प्रा. बाबासाहेब सुतार (७७३८४५८१८५) किंवा श्रीमती स्नेहल मेस्त्री (९५२७९९४६५२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button