
आंजर्ले खाडी पुलावरील मोकाट गुरांचा वावर वाहतुकीस ठरतोय अडथळा
दापोली हर्णे आंजर्ले सुकोंडी केळशी हा मार्ग वाहतुकीच्यादृष्टीने अतिशय महत्वाचा असा मार्ग आहे या मार्गावर एस.टी.बसेसशिवाय खाजगी वाहनांची कायमच वर्दळ सुरू असते अशा या मार्गावर आंजर्ले खाडी पुलावर ठाण मांडून बसलेल्या मोकाट गुरांचा वाहतुकीस मोठाच अडथळा ठरत आहे.दापोली तालुक्यातील दापोली हर्णे आंजर्ले सुकोंडीहून पुढे आडे केळशी मांदिवली या गावांकडे जाणारा एक अतिशय महत्वाचा असा मार्ग आहे. या मार्गावर हर्णे येथील समुद्राच्या पाण्यातील सुवर्णदुर्ग किल्ला, आंजर्लेतील सुप्रसिध्द कडयावरचा गणपती, केळशी येथील श्री महालक्ष्मी देवस्थान त्याचप्रमाणे उटंबर डायरा येथील याकुबबाबा सरवरी दर्गा या पर्यटन स्थळांसह हर्णे येथील जिल्हयातील दुस-या क्रमांकाचे असलेले मच्छिमारी बंदर तसेच केळशी आणि हर्णे येथील व्यापारीपेठांमध्ये आंजर्ले केळशी सुकोंडी पाजपंढरी परीसरातील गावांमधील रहीवाशांची या ना त्या खरेदीच्या निमित्ताने तर पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी पर्यटकांची वाहने सतत या मार्गावर ये जा करत असतात असा हा मार्ग आता सुस्थितीत असला तरी आंजर्ले खाडीपुलावर रात्रंदिन ठाण मांडून बैसलेल्या उनाड गुरांचा वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
www.konkantoday.com