कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतींत वाढ


सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असून एलपीजीच्या दरांत तब्बल 100 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या किमतींत ही वाढ झाली आहे. घरगुती सिलेंडरच्या किमतींत मात्र आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कमर्शियल सिलेंडरच्या दरांत वाढवण्यात आलेल्या किमतींचा प्रभाव खाद्य उद्योग आणि रेस्टॉरंट व्यवसायावर दिसून येईल. म्हणजेच, आजच्या दरवाढीमुळे बाहेर खाणं तुमच्यासाठी महाग होणार आहे.

कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतींत वाढ

आज, 1 नोव्हेंबरपासून, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत 1785.50 रुपयांवर आली असून 101.50 रुपयांनी महागली आहे. ऑक्टोबरमध्ये त्याचे दर 1684 रुपये होते. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1833 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. गेल्या महिन्यात 1 ऑक्टोबर रोजी कमर्शियल सिलेंडरची किंमत 1731.50 रुपये होती. दिल्लीत आजपासून कमर्शियल एलपीजी 101.50 रुपयांनी महाग झाला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button