
विविध संघटनांनी बंद पुकारला असला तरीही तलाठी भरतीची परीक्षा होणार
राज्यात उद्या विविध संघटनांनी बंद पुकारला असला तरीही तलाठी भरतीची परीक्षा होणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन वेळेपूर्वीच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावं असं आवाहन परीक्षा आयोजन करणाऱ्या संस्थेने केलं आहे.त्यासंबंधित एक मेल सर्व उमेदवारांना पाठवण्यात आला आहे.
जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर त्याचा निषेध करण्यासाठी राज्यातील विविध संघटनांनी उद्या म्हणजे सोमवारी बंद पुकारला आहे. त्यामुळे वाहतूकीमध्ये अडचणी येण्याची शक्यता असून त्यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन उमेदवारांनी वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे.
राज्यात तलाठी भरतीसाठी परीक्षा सुरू असून त्याचा एक टप्पा सोमवारी पार पडणार आहे. जालन्यामध्ये घटना घडली असली तरी त्याचा परिणाम परीक्षेवर होणार नसून परीक्षा ही वेळेतच होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
www.konkantoday.com