कोतळूक येथील पुलाचे उद्घाटन

गुहागर : तालुक्यातील कोतळूक कावणकरवाडी येथील कासारी नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या पुलाचे अल्पावधीत काम करणारे ठेकेदार सुरेश चिपळूणकर यांचा जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर अल्पावधीत या पुलाचे काम करून ग्रामस्थांची गैरसोय दूर केल्याबद्दल आ.  भास्कर जाधव यांनी चिपळूणकर यांचे कौतुक केले. ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून या पुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम कावणकरवाडी नारायण टेप भरांडा येथे नुकताच झाला.
कोतळूक कावणकरवाडी कासारी नदीवर पूल व्हावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांची होती. याची दखल घेऊन गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे गेली तीन वर्ष रखडलेला पुलासाठी नाबार्ड योजनेतून 2 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. उद्घाटनवेळी  जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, महेश नाटेकर, माजी पंचायत समिती सदस्य पूनम पाष्टे, माजी सभापती विलास वाघे, कोतळूक सरपंचउर्मिला गोरीवले, उपसरपंच संजीवनी जावळे,  आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button