
जिल्हा प्रशासनाने जिल्हारुग्णालय कोव्हिडं रुग्णालय म्हणून त्वरित घोषित करावे;-दीपक पटवर्धन
रत्नागिरीतील वाढती रुग्ण संख्या आणि सद्य स्थितीत कमी पडणारे बेड लक्षात घेता तातडीने जिल्हा रुग्णालय कोव्हिडं रुग्णालय म्हणून घोषित करावे जिल्हा रुग्णालय तांत्रिक दृष्ट्या अधिक उपयुक्त ठरेल तेथील आय सी यु सुविधा ऑक्सिजन बेड व्हेंटिलेटर सुविधा या सर्वाचा विचार करून जिल्हा रुग्णालय मध्ये पूर्ण कोव्हिडं रुग्णांसाठी उपलब्ध करावे व अन्य रुग्ण अन्य प्रायव्हेट रुग्णालय ताब्यात घेऊन तेथे शिफ्ट करावे अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी केली आहे.
तसेच अन्य प्रायव्हेट डॉक्टर्स तसेच त्यांची हॉस्पिटल्स यांना कोव्हिडं रुग्णांना मेडिकल सेवा देण्यासाठी परवानगी द्यावी. वाढते रुग्ण तसेच सिरीयस होण्याचा धोका लक्षात घेऊन हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्स यांच्या सेवा अतिरिक्त प्रमाणात उपलब्ध करण्यासाठी तत्पर व्हावे. प्रशासनाने आता तत्परता दाखवत वैद्यकीय सुविधा साठी उचित व्यवस्था करावी. असे आवाहन भाजपा रत्नागिरी करत आहे.
www.konkantoday.com