
सिंधुदुर्गचे सिव्हिल सर्जन डॉ श्रीमंत चव्हाण यांच्या अडचणीत वाढ
कर्मचारी महिलेच्या विनयभंगप्रकरणी सिव्हिल सर्जन डॉ. श्रीमंत चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन मंगळवारी हायकोर्टाने फेटाळून लावला. जिल्हा न्यायालयात सरकारी वकील रुपेश देसाई यांनी डॉ. चव्हाण यांना पोलिस कोठडी मिळण्यासाठी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून हायकोर्टाने डॉ. चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे डॉ. चव्हाण यांच्यासमोर आता सुप्रीम कोर्टात जाणे अथवा अटकेला सामोरे जाणे असे दोनच पर्याय राहिले आहेत.
www.konkantoday.com