
चिपळूण येथील हिरापन्ना मिठाई दुकानाला आग, आग विझविण्याचे प्रयत्न सुरू
चिपळूण शहरातील हिरापन्ना या मिठाई दुकानाला अचानक आग लागली. आगीचे लोळ बाहेर येत असून आग लागल्याचे कळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशामक दलालाही ही घटना कळवण्यात आली असून ही आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अचानक लागलेल्या आगीचे कारण अद्याप कळलेले नाही.
www.konkantoday.com