पुणे, संभाजीनगर, नागपूर… पदवीधरांनी महायुतीला हादरवले, मविआची सरशी


राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीतील निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीमध्ये पुणे, छत्रपती संभाजी नगर आणि नागपूरच्यापदवीधर मतदारसंघात राज्यातील सत्ताधारी महायुतीला पदवीधर मतदारांनी जबर दणका दिला असून, तिन्ही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. तर पुणे आणि अमरावती विभागाच्या शिक्षक मतदारासंघात महायुतीचा विजय झाला आहे. विधान परिषदेच्या निवडणूक झालेल्या एकूण पाच मतदारसंघांपैकी तीन ठिकाणी महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. तर दोन जागा महायुतीच्या खात्यात गेल्या आहेत.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख-जाधव विजयी विधान परिषदेच्या पाच जागांपैकी पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजय मिळविला
पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपाच्या कौस्तुभ गावडे विजयी तर पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपाच्या कौस्तुभ गावडे यांनी शिंदेसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन सापन यांचा तब्बल ६ हजार ७७० मतांनी पराभव केलासंभाजीनगर पदवीधर मतदारसंघामध्ये प्रतापसिंह पाटील यांना विजयी आघाडी छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी महायुतीचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्याविरुद्ध निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केलाअमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक विजयी अमरावती शिक्षक मतदारसंघात मात्र महायुतीला दिलासा देणारं यश मिळालं आहे. येथे शिंदेसेनेचे किरण सरनाईक दुसऱ्या पसंतिक्रमाच्या अखेरच्या बाद फेरीत विजयासाठी आवश्यक १६,१३४ मतांचा कोटा पार करीत विजयी झाले.

नागपूरमध्ये भाजपाला धक्का, अभिजित वंजारी यांना विजयी आघाडी राज्यातील सत्ताधारी भाजपासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये सत्ताधारी भाजपावर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. येथे पहिल्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीत आघाडीवर असलेले भाजपाचे सुधाकर कोहळे यांना दुसऱ्या पसंती क्रमाच्या मतमोजणीत धक्का बसला असून, काँग्रेसचे विद्ममान आमदार अभिजित वंजारी यांनी निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button