रत्नागिरीत १ किलो २०१ ग्रॅम गांजासह तरुण ताब्यात!


रत्नागिरी शहरात गांजाविक्रीसाठी बाळगलेल्या १ किलो २०१ ग्रॅम गांजासह एका २४ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सूरज परशुराम नंदिवले असे या तरुणाचे नाव असून, तो रत्नागिरीतील नाचणकर चाळ, एमआयडीसी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.त्याचे मूळ गाव पाचवड, ता. वाई, जि. सातारा आहे.

दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक शहर परिसरात गस्त घालत होते. यावेळी नाचणकर चाळ परिसरात एनडीपीएस कायद्यांतर्गत यापूर्वी नोंद असलेल्या सूरज नंदिवले याच्याकडे गांजा आढळून आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button