आयशर टेम्पो ची रिक्षाला जोरदार धडक रिक्षा चालकासह महिला प्रवासी जखमी

लांजा: मुंबई-गोवा महामार्गावर लांजा रेस्ट हाऊसनजीक इंडियन ऑईल पंपासमोर आयशर टेम्पोने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालकासह महिला प्रवासी जखमी झाली. हा अपघात शनिवारी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश महेंद्र वाडकर (वय २६, रा.पोलादपूर, जि.रायगड) हा आयशर टेम्पो (एमएच.०६.सीपी.३७६७) घेऊन कुडाळ येथून रायगडच्या दिशेने जात होता. लांजा शहरातील इंडियन ऑईल पंपानजीक आल्यानंतर टेम्पोवरील ताबा सुटल्याने त्याने पुढे जात असलेल्या रिक्षा क्रमांक (एमएच.०८.ए क्यू.९४३६) याला पाठीमागून धडक दिली.
या धडकेत रिक्षाचालक चंद्रकांत पांडुरंग साळवी (वय ४८) आणि रिक्षातील प्रवासी मिनाक्षी बाळकृष्ण चव्हाण (वय ६५), दोघेही राहणार बोरथडे, ता.लांजा हे जखमी झाले. अपघातानंतर दोघांना तातडीने तर लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, या अपघातात चंद्रकांत साळवी यांच्या पाठीला मुका मार लागला. तसेच मिनाक्षी चव्हाण यांच्या मानेला दुखापत झाली. तर साळवी यांच्यावर लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते, त्याचप्रमाणे चव्हाण यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले. विशेषतः जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी आधार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष राजू जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button