दैवज्ञ हितवर्धक समाज रत्नागिरी आयोजित, रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२६-२७


रत्नागिरी – दैवज्ञ हितवर्धक समाज, रत्नागिरी यांच्या वतीने दि. २८ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर, २०२६ या कालावधीत दैवज्ञ भवन हॉल, पॉवर हाऊस, नाचणे रोड, रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. उद्घाटन समारंभ मा. नाम. उदयजी सामंत, उद्योग व मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, रत्नागिरी यांच्या शुभहस्ते शनिवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता “दैवज्ञ भवन, पॉवर हॉऊस, रत्नागिरी” येथे होणार आहे.
सदर स्पर्धा १. पुरुष एकेरी, २. पुरुष दुहेरी, ३. महिला एकेरी, ४. वयस्कर गट, ५. कुमार गट, ६. कुमारी गट, ७. किशोर गट व ८. किशोरी गट अशा आठ गटात खेळवली जाणार आहे. सन २०२६-२०२७ या वर्षातील ही पाचवी स्पर्धा आहे. नवीन खेळाडूंनी २०२६ – २७ या वर्षाची रजिस्टेशन फी रु. ५०/- जिल्हा असोसिएशनकडे जमा करावी. स्पर्धेसाठी प्रवेश फी पुरुष व महिला गटासाठी रु. १५०/- दुहेरीसाठी रु. २००/- व लहान गटासाठी रु.१००/- याप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे. वयस्कर गटातील खेळाडूंना पुरुष एकेरीमध्ये सहभाग घेता येईल. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवशक आहे अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करणात येईल. सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका सोमवार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंतच आपल्या तालुका प्रतिनिधीकडे स्पर्धा शुल्कासहित द्यावा. स्पर्धा शुल्काशिवाय कोणत्याही प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत. विहीत वेळेत न आलेल्या प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. याबाबत कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही. स्पर्धेत सामना खेळणासाठी खेळाडूने पांढरा रंगाचा टी शर्ट किंवा पांढरा शर्ट परिधान करणे आवश्यक आहे. वयस्कर गटातील खेळाडूंना पुरुष एकेरीमध्ये सहभागी होता येणार नाही. ज्या गटात ८ स्पर्धक नसतील त्या गटाची स्पर्धा रद्द करण्यात येईल. मागावून कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. या स्पर्धेपासून पुरुष दुहेरी गटाचे सर्व सामने चार बोर्डाचे तीन सेट असतील याची सर्व स्पर्धकांनी नोंद घावी. आयोजकांतर्फे खेळांडूकरीता सकाळी नाश्ता व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. सदर स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी यांना उप उपांत्य फेरीपर्यंत रोख बक्षीसे ठेवण्यात आलेली आहेत. तसेच विजेते व उपविजेते खेळांडूकरीता डायमंड ज्वेलरी खरेदीवर पवित्रम कंपनी तर्फे रत्नशिल्प ज्वेलर्स (मालक-श्री. सतोष भुर्के), रत्नागिरी यांचे मार्फत खेळाडूंना खरेदीवर रुपये १०,०००/- ची गिफ्ट व्हाऊचर्स देण्यात येणार आहे. (नियम व अटी लागू)
तालुका प्रतिनिधी खालीलप्रमाणे
१. गुहागर श्री. प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०)
२. रत्नागिरी श्री. विनायक जोशी (८३९०३८७४८३)
३. देवरूख – श्री. राहुल भस्मे (९६५७६३७६७८), श्री. मोहन हजारे (९४२२०५३९४३)
४. चिपळूण- श्री. प्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२), श्री. दीपक वाटेकर (९९७५५४६६२५)
५. संगमेश्वर श्री. मनमोहन बेंडके (९१३०३०६५२५)
६. लांजा श्री. मनोज जाधव (७६२०११६७३६)
७. खेड श्री. योगेश आपटे (९९५३२२२६३१)
८. राजापूर श्री. मनोज सप्रे (९४०३७६८३७६)
९. दापोली श्री. माधव शेट्ये (९२०९७०९७९२)
सदर स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून राज्यस्तरीय पंच श्री. सागर कुलकर्णी, राज्यस्तरीय पंच श्री. मंदार दळवी तसेच स्पर्धा प्रमुख म्हणून राष्ट्रीय पंच श्री. सचिन बंदरकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेणाचे आवाहन श्री. संतोष भुर्के (अध्यक्ष, दैवज्ञ हितवर्धक समाज, रत्नागिरी), श्री. सुहास वीरकर (उपाध्यक्ष, दैवज्ञ हितवर्धक समाज, रत्नागिरी), श्री. धनेश रायकर (सेक्रेटरी, दैवज्ञ हितवर्धक समाज, रत्नागिरी), श्री. गुरुप्रसाद खेडेकर (खजिनदार, दैवज्ञ हितवर्धक समाज, रत्नागिरी), श्री. संतोष खेडेकर (कार्याध्यक्ष, दैवज्ञ हितवर्धक समाज, रत्नागिरी) व कार्यकारणी मंडळ, दैवज्ञ हितवर्धक समाज, रत्नागिरी, श्री. सुचय अण्णा रेडीज (ज्येष्ठ सल्लागार, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन), (श्री. प्रदीप भाटकर (अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन), श्री. सुरेंद्र देसाई (उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन) श्री. मिलींद साप्ते (सचिव, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन), श्री. नितीन लिमये (खजिनदार, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन) यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button