कापडगाव येथे साहित्याने भरलेला ट्रक पलटी; चालक केबिनमध्ये अडकला


अपघाताची माहिती मिळताच हायवे पोलिसांची घटनास्थळी धाव


रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कापडगाव येथे थोड्याच वेळापूर्वी साहित्याने भरलेला ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात ट्रकचा चालक केबिनमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे.

हा ट्रक साहित्य घेऊन पालीच्या दिशेने जात असताना कापडगाव परिसरात अचानक पलटी झाला. अपघाताची माहिती मिळताच हायवे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. चालकाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button