लक्ष्मी चौक ते मारुती आळी रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न समोपचाराने सोडवणार


पालकमंत्री उदय सामंत यांची पाहणी; व्यापारी व नगरपरिषद प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा


रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील लक्ष्मी चौक (गाडीतळ) ते मारुती आळी या प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाची राज्याचे उद्योग, गुंतवणूक व सेवा आणि मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली. रस्ता रुंदीकरणाच्या अनुषंगाने स्थानिक व्यापारी आणि नगरपरिषद प्रशासनासोबत त्यांनी चर्चा केली.

यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्यासह स्थानिक व्यापारी उपस्थित होते. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत करण्यासाठी तसेच भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेता हा रस्ता रुंदीकरणाचा विषय महत्त्वाचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पाहणीदरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांनी प्राचीन दक्षिणामुखी श्री हनुमान मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर स्थानिक व्यापारी आणि नगरपरिषद प्रशासनाशी रस्ता रुंदीकरणाबाबत सविस्तर चर्चा केली.

रस्ता रुंदीकरण ही शहराच्या विकासाच्या दृष्टीने काळाची गरज आहे. मात्र, स्थानिक व्यापाऱ्यांचे हित आणि त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन समोपचाराने या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

स्थानिक व्यापारी, नागरिक आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून विकासकाम मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याने लक्ष्मी चौक ते मारुती आळी रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button