
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीत दक्षता जनजागृती सप्ताह अंतर्गत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली सत्यनिष्ठेची शपथ
रत्नागिरी, दि. ३० ): महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित (रत्नागिरी विमानतळ) येथे दक्षता जनजागृती सप्ताहाचे (Vigilance Awareness Week) आयोजन करण्यात आले. या निमित्ताने विमानतळावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्याचा आणि पारदर्शकतेचा अंगीकार करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमात सहाय्यक कार्यकारी अभियंता अजय देसाई, मुख्य सुरक्षा अधिकारी योगेश माईंगडे आणि वरिष्ठ लिपीक दीपक सावंत यांनी उपस्थित राहून ‘सतर्क भारत, समृद्ध भारत’ तसेच ‘भ्रष्टाचार दूर करा, राष्ट्र निर्माण करा’ हा संदेश देत सत्यनिष्ठेची प्रतिज्ञा घेतली. कामकाजात पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीने काम करून देशाच्या विकासात योगदान देण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी व्यक्त केला.




