
चिपळूण तालुक्यातील येगांवमध्ये वाघासह दाेन बछड्यांचे दर्शन
चिपळूण तालुक्यातील येगांव येथील जिल्हा परिषद आदर्श शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांना पट्टेरी वाघासह दाेन बछड्यांचे मंगळवारी सकाळी दर्शन झाल्यानंतर खळबळ उडाली. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांनी तातडीने वनविभागासह स्थानिक प्रशासकीय यंत्रणेला पत्र पाठवून तातडीची उपाययाेजना करण्याची मागणी केली आहे. वनविभागाच्या अधिकाèयांनीही या भागाची तात्काळ पाहणी करत टॅप कॅमेरे बसवण्याची ग्वाही ग्रामस्थांना दिली आहे.




