वन्यप्राण्यांच्या हालचालींवर आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नजर ठेवता येणार


वन्यप्राण्यांच्या हालचालींवर आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नजर ठेवता येणार आहे. शेतीचे नुकसान आणि मानव-वन्यजीव संघर्ष राेखण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे ’अ‍ॅनिमल डिटेक्शन अ‍ॅण्ड माॅनिटरींग डिव्हाईस’ हे नावीन्यपूर्ण उपकरण विकसित करणाèया सह्याद्री पाॅलिटेक्निकच्या सहाय्यक प्राध्यापिका हर्षला अरविंद राजेशिर्के यांच्या संशाेधनाला भारत सरकारचे ’डिझाईन पेटंट’ मंजूर झाले आहे. त्यांच्या या संशाेधनामुळे सह्याद्री पाॅलिटेक्निकच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवला गेला असून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गंभीर समस्येवर उपाय शाेधण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.
सह्याद्री पाॅलिटेक्निकच्या इलेक्टाॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (ई अ‍ॅण्ड टीसी विभागात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या राजेशिर्के यांनी वन्यप्राण्यांमुळे शेतीचे हाेणारे नुकसान आणि वाढता मानव-प्राणी संघर्ष लक्षात घेऊन हे उपकरण विकसित केले आहे.
ग्रामीण तसेच शेतीप्रधान भागात वन्यप्राण्यांच्या वावरामुळे शेतकèयांना माेठ्या नुकसानाैला सामाेरे जावे लागते. अनेकदा वन्यप्राण्यांची उपस्थिती वेळीच लक्षात न आल्याने पिकांचे नुकसान हाेते. काही प्रसंगी मानवी जीवितालाही धाेका निर्माण हाेताे. या समस्येवर तांत्रिक उपाय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने त्यांनी हे संशाेधन केले.
’अ‍ॅनिमल डिटेक्शन अँड माॅनिटरिंग डिव्हाईस’ हे उपकरण शेत किंवा मानवी वस्तीच्या परिसरात वन्यप्राण्यांची उपस्थिती ओळखून सतर्कतेचा इशारा देण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. वन्यप्राण्यांच्या हालचालीची वेळेत माहिती मिळाल्यास संभाव्य धाेका ओळखणे, पिकांचे नुकसान टाळण्यासाठी उपाययाेजना करणे आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी मदत हाेऊ शकते त्यामुळे या संशाेधनाला शेती वन्यजीव संवर्धन आणि ग्रामीण सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्व प्राप्त झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button