
इंडिगोच्या विमानात पॉवर बँकचा भडका; विमानाचे हैदराबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग
उड्डाणादरम्यान धूर आणि ज्वाळा; केबिन क्रूच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
दिल्लीहून चेन्नईकडे जाणाऱ्या इंडिगोच्या 6E-6115 विमानात प्रवाशाच्या पॉवर बँकने अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. उड्डाणादरम्यान पॉवर बँकमधून धूर आणि ज्वाळा निघू लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केबिन क्रूने तातडीने अग्निशमन उपकरणाच्या मदतीने आग नियंत्रणात आणली. खबरदारीचा उपाय म्हणून विमानाचा मार्ग बदलण्यात आला आणि हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले.
केबिन क्रूच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टाळण्यात मदत झाली. या घटनेमुळे विमान प्रवासादरम्यान पॉवर बँक आणि लिथियम-आयन बॅटरी असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.




